म. फुलेंचे विचार मार्क्‍सपेक्षा श्रेष्ठ : डॉ. फरांदे

सातारा – समताधिष्ठीत समाज निर्मिती साठी शोषणा विरुद्धचे तत्वज्ञान मांडणारे म. फुले हे कार्ल मार्क्‍स पेक्षा श्रेष्ठ होते, असे मत डॉ. प्रमोद फरांदे यांनी व्यक्त केले. संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत’ म. फुलेंचा सत्यशोधक धर्म व समाज’ या विषयावर डॉ. फरांदे बोलत होते. विचार मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कोषाध्यक्ष केशवराव कदम व पत्रकार अरुण जावळे उपस्थित होते.

डॉ. फरांदे म्हणाले, म. फुले यांनी समतेवर आधारित समाज निर्मितीचे बीज पेरले. भारतीय परिप्रेक्षात त्यांनी केलेला विचार मार्क्‍स पेक्षा चार पाऊले पुढे होता. त्यांनी केलेल्या संपूर्ण चळवळीत हिंसेला अजिबात थारा नव्हता. महाराष्ट्राच्या प्रगतीत व सहकारी संस्थांचे जाळे उभारण्यात सत्यशोधक समाज चळवळीचे मोलाचे योगदान आहे. म. फुलेंनी ईश्‍वर मानलेला नाही तर सृष्टीचा निर्मिक अशी पर्यायी संकल्पना मांडली आहे.पुरोहिताशिवाय सत्यशोधक विवाह व इतर संस्कार विधी पार पाडण्याचा आदर्श पर्याय समाजाला दिला.

-Ads-

यशवंतराव चव्हाण यांच्यावरही या चळवळीचा प्रभाव होता. प्रमोद फरांदे यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांची दीनबंधू मधील सामाजिक पत्रकारिता या विषयावर शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल तसेच औरंगाबादच्या डॉ. आंबेडकर रिसर्च सेंटरचा विचार गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार अरुण जावळे, ज्येष्ठ कार्यकर्ते पत्रकार विजय मांडके यांचासत्कार करण्यात आला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)