म्हासुर्णे येथील श्रीराम विद्यालयाचे यश

म्हासुर्णे – खटाव तालुक्‍यातील श्री विद्यालय व राजा भगवंतराव ज्यनिअर कॉलेज औंध येथे पंचायत समिती खटाव (वडूज) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत श्रीराम विद्यालय म्हासुर्णेच्या विद्यार्थीनीने यश संपादन केले.

औंध येथील श्रीविद्यालय व राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेज येथे पंचायत समितीच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात निंबध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये श्रीराम विद्यालय म्हासुर्णेची कु. प्रिती आण्णा माने (9 वी) हिने मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याबद्दल तिचा शिक्षण विस्तार अधिकारी चंदुरे मॅडम व डायट फलटणचे प्राचार्य कोरडे यांच्या हस्ते कु. प्रीती माने हिचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रिती माने हिने मिळवलेल्या यशाबद्दल औंध येथील श्री विद्यालयातील मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने, सरपंच सचिन माने, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने, मुख्याध्यापक हांडे, प्रा. राठोड, प्रा. मुल्ला, प्रा. परदेशी, प्रा. शेख, प्रा. म्हमाणे, प्रा. केराम, प्रा तोरणे. व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)