म्हासुर्णे, दि. 6 (प्रतिनिधी) – खटाव तालुक्‍यातील म्हासुर्णे परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊसाला हुमणी लागल्याने एकरच्या एकर ऊसाचे प्लॉट गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.
सध्या म्हासुर्णे परिसरात हुमणीने मोठ्या प्रमाणात उसाच्या पिकाचे नुकसान केले असून हजारो हेक्‍टर ऊसाचे उत्त्पन्न घटणार आहे. त्याचे परिणाम कारखानदार व शेतकऱ्यांवर होणार आहेत. तरी हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असून गावोगावी हुमणी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांच्या बैठका घेणे गरजेचे आहे. फक्त तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका घेऊन हा प्रश्न सुटणार नाही. तरी कृषी विभागाने तातडीने या विषयाच्या अनुषंगाने चर्चासत्र आयोजित करणे गरजेचे आहे. या परिसरातील 18 ते 19 कांड्यावरती असणाऱ्या उसाला हुमणी लागल्याने अख्खे प्लॉट भुईसपाट झालेले आहेत, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. या परिसरातील आडसाली लागण व अडसाली खोडव्यांना मोठ्या प्रमाणात हुमणीचा प्रादुर्भाव झालेले दिसून येत आहे. आवश्‍यक ते उपाय करूनसुद्धा हुमणी आटोक्‍यात येत नसल्याने उसाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)