म्हासुर्णे खेराडे वांगी रस्त्याची दुरवस्था

म्हासुर्णे, दि. 30 (वार्ताहर) – म्हासुर्णे ते खेराडे वांगी रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून प्रचंड मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. तातडीने रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा म्हासुर्णे ग्रामस्थांनी दिला आहे.
म्हासुर्णे येथून खेराडे वांगी मार्गे विटा शहराकडे येण्याचा जाण्याचा मुख्य रस्ता आहे. गेल्या कित्येक वर्षात या रस्त्यावर डांबरीकरण सोडाच पण मुरमीकरणसुध्दा झाले नाही, म्हासुर्णे हे गाव कराड उत्तर मतदार संघात येते. तर खेराडे वांगी हे गाव पलुस कडेगाव या मतदारसंघात येते दोन मतदारसंघामधील रस्ता अत्यंत खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. साडेतीन ते चार किलोमीटरच्या रस्त्यामध्ये कोठेही डांबरी रस्ता शिल्लक राहिला नाही. रस्त्याची प्रचंड दुरवस्था होवूनही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. या रस्त्यावरील खड्डेही कधी भरले गेले नाहीत. अनेक वेळा गाड्या खड्ड्यात पडून अनेकजण जखमी झाले आहेत. रस्ता दुरुस्त होत नसल्यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी रस्ता तातडीने दुरुस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)