म्हासुर्णेत छ. शाहू महाराज जयंती उत्साहात

म्हासुर्णे, दि. 28 (प्रतिनिधी) – म्हासुर्णे, ता. खटाव येथील श्रीराम विद्यालयात लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने व मान्यंवराच्या यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पूजन पुप्षहार घालून करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन महादेव माने म्हणाले, शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे केल्यामुळे बहुजन समाजातील मुले शिकली. शाहू महाराजांसारखा जाणता राजा होणे शक्‍य नाही. पाचवी ते सातवीतील विद्यार्थी व विद्यार्थीनीना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.व्हा.चेअरमन शिवाजी माने, सचिव राजाराम माने, संचालक भिमराव माने, राजाराम कुलकर्णी, किसन माने, काशिनाथ माने, पांडुरंग माने, विलास माने, रामचंद्र माने, गोरख माने, वसंत कुलकर्णी, नथुराम माने, स्वप्नील माने, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिचंद्र माने व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक पी. व्ही. हांडे, राठोड, उपस्थित होते. मोहन तोरणे, हरिदास सांळुखे, दत्ता पवार, दिलीप कोळी यांनी नियोजन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)