म्हासुर्णेच्या प्राथमिक शाळेस शैक्षणिक साहित्याचे वाटप

म्हासुर्णे : विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करताना सिकंदर मुला, सुखदेव घाडगे, गुलाब वायदंडे, महामुनी मॅडम (छाया : तुषार माने)

म्हासुर्णे, दि. 8 (प्रतिनिधी)- म्हासुर्णे गावचे सुपुत्र सुखदेव (भाऊ) घाडगे यांच्या कन्या गायत्री सुखदेव घाडगे यांच्या मार्फत म्हासुर्णे येथील जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये शाळेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
म्हासुर्णे जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये अंगणवाडी, पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांना शालेय साहित्य पेन, वही व इतर शालेय साहित्य खाऊ वाटप म्हासुर्णे गावचे सरपंच सचिन माने, उपसरपंच सुहास माने, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष सिकंदर मुल्ला, गुलाब वायदंडे या मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापिका महामुनी, सोन्या पवार, मुस्तफा तांबोळी, निवास वायदंडे, धनजंय माने उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी म्हासुर्णे ग्रामस्थ, युवक व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)