म्हाळुंगे पडवळला व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा

मंचर- मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने राज्यभर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथे शांततामय वातावरणात कडेकोट बंद पाळण्यात आला. सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला.
सकल मराठा समाजाच्या वतीने बंदच्या आवाहनानंतर महाळुंगे पडवळ या गावाबरोबरच आजुबाजूच्या नांदुर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, साकोरे याही ठिकाणी शांततेच्या मार्गाने बंद पाळून पाठिंबा दर्शविला गेला. महाळुंगे पडवळ या ठिकाणी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करत प्रभातफेरी काढण्यात आली, तसेच हुतात्मा बाबुगेनू चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी डॉ. दत्ता चासकर, बाबाजी चासकर, पी. डी. सैद, दादाभाऊ चासकर, तंटामुक्ती अध्यक्ष डॉ. विठ्ठल चासकर, सुभाष पडवळ, टि. जी. पडवळ, अनिल पडवळ, माणिक सैद, नारायण डोके, मयुर पडवळ, सुशांत सैद, प्रशांत सैद, मुकुंद बारवे, लंकेश पडवळ, अक्षय आवटे, संतोष आंबटकर, ज्ञानेश्वर राऊत, तसेच गावातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मंचर पोलीस स्टेशनच्या वतीने महाळुंगे पडवळ येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे नांदुर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी या ठिकाणी शांततापूर्ण मार्गाने बंद यशस्वी करण्यासाठी अंकीत जाधव व उपसरपंच अनिल चिखले यांनी पुढाकार घेतला. साकोरे येथे उपसरपंच विजय मोढवे यांच्या नेतृत्वाखाली बंद यशस्वीरीत्या पार पडला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)