म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा आजपासून

पारगाव शिंगवे- आंबेगाव तालुक्‍यातील धामणी येथील म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा मंगळवार (दि. 19) व बुधवारी (दि. 20) आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त मंगळवारी सकाळी देवास हारतुरे, महापूजा, झेंडा व शर्यतीच्या बैलांची भव्य मिरवणूक, नवसपूर्तीची जागरणे व तळीभंडार आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सांयकाळी पालखी मिरवणूक व रात्री तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी कलीतुऱ्याचा कार्यक्रम व दुपारी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. रात्री मंगला बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्या तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून ग्रामपंचायतच्या वतीने यात्रेमध्ये आलेल्या भाविकांना उत्कृष्ट सेवा देण्याचे नियोजन केले आहे. फारबरची शौचालय, पाण्याचे अतिरिक्त टॅंकर, लाईटचे 3 टॉवर आणि पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)