म्हाळसाकांत खंडाबाच्या मंदिराला दिल्या खुर्च्या

पारगाव शिंगवे -आंबेगाव तालुक्‍यातील धामणी येथील म्हाळसाकांत खंडोबा देवाच्या मंदिरास द्वारपालच्या मूर्ती व 9 स्टिलच्या खुर्च्या तसेच मंदिरात वातानुकूलित एसी भाविकांकडून देवस्थानला देण्यात आला. धामणी गावातील म्हाळसाकांत खंडोबा हे देवस्थान भाविकांचे जागृत देवस्थान समजले जाते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे दोन्ही बाजूला जय व विजय या द्वारपालाच्या दोन संगमरवरी मूर्ती धामणी येथील भाविक बबनराव अर्जुन भुमकर व राजाराम बबनराव विधाटे यांनी आपल्या दिवंगत मातोश्रीच्या स्मरणार्थ दिल्या. तसेच भाविकांसाठी वातानुकूलित ए.सी. अनिल ठकूजी पडवळ यांनी देवस्थानाला अर्पण केला. तसेच म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात भाविकांचे सोईसाठी भावडी येथील भाविक मीराबाई लक्ष्मण काळे व शंकर लक्ष्मण काळे यांनी नऊ स्टिलच्या खुर्च्या खंडोबा जीर्णोद्धार समितीकडे सुपूर्त केल्याची माहिती जीर्णोद्धार समितीने दिली. गेल्या महिन्यात पार पडलेल्या माघ पौर्णिमेच्या खंडोबाच्या यात्रेत या भाविकांनी सर्व वस्तू देण्याचे जाहीर केले होते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)