म्हाडाच्या 812 घरांसाठी ऑनलाइन सोडत

नावे आलेल्यांना कागदपत्रे, 10 टक्‍के रक्‍कम ऑनलाइन भरावी लागणार

पुणे – म्हाडा पुणे विभागातर्फे 812 घरांसाठी बुधवारी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. यामध्ये घरांसाठी नावे आलेल्यांना 5 जानेवारीपर्यंत कागदपत्रे आणि 10 टक्‍के रक्‍कम ऑनलाइन भरावी लागणार आहे. मुदतीत कागदपत्रे आणि रक्कम न भरणाऱ्यांची लॉटरीत मिळालेली घरे रद्द केली जाणार आहेत. दरम्यान, जानेवारी महिन्यात म्हाडाच्या 3 हजार 700 घरांसाठी सोडत काढली जाणार असल्याची माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

म्हाडाच्या घरांसाठी अल्पबचत भवन येथे सकाळी अकरा वाजता लॉटरीला सुरुवात झाली. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, पुणे विभागाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे आदी उपस्थित होते.

बुधवारी झालेल्या सोडतीमध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीतील 242 आणि पिंपरी-चिंचवडमधील 570 अशी एकूण 812 घरे आहेत. त्यासाठी 36 हजार 565 जणांनी अर्ज भरले होते. पुण्यात महंमदवाडी, धानोरी, पाषाण, बावधन, येवलेवाडी आणि आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये ही घरे आहेत. पिंपरी-चिंचवडमधील वाकड, पुनावळे, पिंपळे सौदागर, ताथवडे, किवळे, रहाटणी, पिंपळे निलख, मोशी, चिखली आणि चोवीसवाडी येथील प्रकल्पांमधील घरे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)