म्हाडाच्या सोडतीत “शिवसेने’ला लॉटरी ; तीन लोकप्रतिनिधींना कोट्यवधींची घरे

मुंबई: मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) मुंबईतील विविध गृहप्रकल्पांची आज संगणकीय सोडत झाली आहे. या सोडतीत एक हजार 384 लोकांचे मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, या सोडतीमध्ये “शिवसेने’ला लॉटरी लागली आहे. शिवसेनेचे शाखा प्रमुख विनोद शिर्के, नगरसेवक रामदास कांबळे आणि खासदार हेमंत गोडसे यांना कोट्यवधी रुपयांची घरे लागली आहेत.

नाशिकमधील शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना लोअर परेलमध्ये म्हाडाचे घर लागले आहे. या फ्लॅटची सुमारे किंमत 99 लाख रुपये असल्याची माहिती आहे. सायनमधील प्रतिक्षानगरचे शिवसेना नगरसेवक रामदास कांबळे यांना तुंगा, पवई भागात उच्च उत्पन्न गटातील 99 लाख रुपये किमतीचे म्हाडाचे घर लागले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेनेचे शाखा प्रमुख विनोद शिर्के यांना कोट्यवधी रुपयांच्या किमतीचे दोन फ्लॅट लागले. ग्रॅंट रोडमध्ये “कंबाला हिल’ परिसरात असलेल्या धवलगिरी इमारतीत हे फ्लॅट आहेत. एकाची किंमत पाच कोटी 80 लाख, तर दुसऱ्याची चार कोटी 99 लाख रुपये आहे.

गेल्या 15 वर्षांपासून म्हाडाच्या घरासाठी अर्ज करत होतो. मी एक आयटी इंजिनियर आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये आहे. त्यामुळे घर घेण्याची इच्छा होती. याआधी कोट्यवधी किमतीचे घर निघाले नव्हते, पण आता घर घेण्याचे स्वप्न साकार झाले आहे, अशी प्रतिक्रिया विनोद शिर्के यांनी दिली.

लॉटरीत नशिबाची हुलकावणी

भाजपचे माजी आमदार आणि नगरसेवक अतुल शहा हे कांदिवली महावीर नगरमधील म्हाडाच्या घराच्या प्रतीक्षा यादीत आहेत. खरे तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अतुल शहा हे लॉटरी पद्धतीने विजयी झाले होते. शहा आणि शिवसेना उमेदवाराला समसमान मते मिळाल्यामुळे लॉटरी पद्धतीने निकाल काढल्यावर शहा निवडून आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)