म्हाडाच्या घरासाठी चार हजार नागरिकांनी केली नोंदणी

 

पुणे- म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी -चिंचवड येथील 3 हजार 139 सदनिका आणि 29 भूखंडाच्या विक्रीसाठी सोडत सुरू केली आहे. मागील चार दिवसात म्हाडाच्या घरासाठी सुमारे चार हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे सभापती समरजितसिंग घाटगे यांनी दिली.

म्हाडाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये घाटगे यांनी ही माहिती दिली. यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे उपस्थित होते. केंद्र शासनाने 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याची योजना आखली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने पाऊले उचलली आहेत. राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभाग हा नागरिकांना परवडणारी घरे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हाडा पुणे विभागातर्फे अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी या घरांची सोडत जाहीर केली आहे. त्यासाठी lottery.mahada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. 18 जून 2018 पर्यंत नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार असल्याचे घाटगे यांनी सांगितले.

यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काकडे यांनी सांगितले की, यापूर्वी म्हाडाने 2 हजार 500 घरांची सोडत जाहीर केली होती. त्याचे वाटपही करण्यात आले आहे. आता म्हाडाने 3 हजार 139 घरांची सोडत आणली आहे. म्हाडाची सोडतही पूर्णपणे ऑनलाईन आहे. यामध्ये कुठेही मानवी हस्तक्षेप होत नाही. नोंदणी करणे, सोडत जाहीर करणे आणि प्रतिक्षा यादी करणे आदी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीनेच पार पडणार आहे. उत्कृष्ट आणि भूकंपरोधक बांधकाम आणि आधुनिक सुविधा ही म्हाडाच्या घरांची वैशिष्ट्ये असल्याचे काकडे यांनी सांगितले.

या ठिकाणी घरे उपलब्ध
परिसराचे नाव – घरांची संख्या
नांदेड सिटी – 1080
रावेत, पुनावळे – 120
वाकड – 22
चऱ्होली वडमुखवाडी -214
मोशी – 239
येवलेवाडी – 80
कात्रज – 29
धानोरी – 51

उत्पन्न मर्यादा
आर्थिकदृष्टया मागास वर्ग – तीन लाखांपर्यंत
अल्प उत्पन्न गट- तीन लाख ते सहा लाख
मध्यम उत्पन्न गट – सहा लाख ते नऊ लाख
उच्च उत्पन्न गट – नऊ लाखांपेक्षा अधिक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)