“म्हाडा’ची सर्वाधिक घरे नांदेड सिटीत उभारली जाणार

असे आहे सोडतीचे वेळापत्रक
* म्हाडा ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ https://lottery.mahada.gov.in
* ऑनलाइन अर्जाची नोंदणी सुरूवात दि. 19 मे ते 18 जून
* नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचा दिनांक 20 मे ते 19 जून
* क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट भरण्याची सुविधा
* सोडतीचा प्रस्तावित दिनांक : 30 जून 2018

अल्प व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना हक्‍काच्या घराची संधी

पुणे – म्हाडाच्या पुणे विभागातर्फे विभागातील विविध ठिकाणच्या 3 हजार 139 सदनिका व 29 भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. घरे व भूखंड हे लॉटरी पध्दतीने वाटप केले जांणार आहे. यातील सर्वाधिक म्हणजे 1 हजार 80 घरे ही नांदेड सिटीमधील आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, कमी उत्पन्न गट आणि उच्च मध्यमवर्गीय गटातील नागरिकांसाठी म्हाडाकडून 3 हजार 139 सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. घरांसाठी सोडत ही लॉटरी पध्दतीने होणार आहे. यासाठी नागरिकांना येत्या शनिवारपासून (दि.19) ऑनलाइन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. तर घरांची सोडत ही 30 जून 2018 रोजी होणार आहे. म्हाडा पुणे विभागातर्फे अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी या घरांची सोडत होणार आहे. त्यासाठी नागरिकांना म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. नोंदणी प्रक्रिया येत्या शनिवारपासून (दि.19) दुपारी बारा वाजल्यानंतर सुरू होणार आहे. नागरिकांना ऑनलाइन पध्दतीने अर्ज करता येणार आहे.

राज्य शासनाच्या टाऊनशीप कायद्यान्वये टाऊनशीपमधील काही घरे ही अल्प व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उभारण्यात येतात. त्यानुसार नांदेड सिटीमध्ये पहिल्या टप्प्यात 1 हजार 80 घरे “जनरंजनी’ या गृहप्रकल्पांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 30 व 40 चौरस मीटर क्षेत्राच्या सदनिकांचा यामध्ये समावेश आहे. खासगी विकसकामार्फत एवढ्या मोठ्या संख्येने अल्प व मध्यम गटातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणारी नांदेडसिटी ही राज्यातील पहिलीच बांधकाम संस्था आहे. ही घरे म्हाडामार्फत लॉटरीद्वारे नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)