म्हस्कोबा मंदिराचा ग्रामस्थांना विसर

रावणगाव – नंदादेवी (ता. दौंड) गावातील म्हस्कोबा मंदिराचा ग्रामस्थांना विसर पडला असून मंदिराच्या छताबरोबर परिसराची मोठी दुरवस्था झालेली आहे. म्हस्कोबा देवाच्या नजीकच्या काळात येणाऱ्या यात्रेवर यामुळे मोठा परिणाम जाणवणार असून, यात्रेकरूंची मोठी गैरसोय होताना दिसेल. मंदिराचे पत्र्याचे छत पूर्णपणे उचकटले असून, फरशीची जागोजागी मोडतोड झाली आहे. पायऱ्याही निघाल्या आहेत. दूरवरून अनेक भाविक यात्रेसाठी येत असतात. या यात्रेकरूंसाठी बांधलेली पाण्याची टाकी ना दुरुस्त आहे. त्यात पाणी सोडण्याची व्यवस्थाच नाही. मंदिर परिसरात गवत उगवले आहे. लाखो रुपयाची विकास कामे, पाणीदार गाव यांसारखे उपक्रम घेणारे गाव म्हणून नंदादेवी गावाची ओळख आहे. मात्र, मंदिर दुरुस्तीत हलगर्जीपणा का, हा प्रश्न पडतो


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)