म्हसवेश्वरच्या वतीने सभासदांना 10 टक्के लाभांश

पिरंगुट- मुठा खोऱ्यातील म्हसवेश्वर विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन अशोक मारणे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभासदांना 2017 आणि 2018 या आर्थिक वर्षात 10 टक्के लाभांश जाहीर केल्याची माहिती संचालक भाऊ मरगळे यांनी दिली.
मुळशी तालुक्‍यातील सर्वात मोठी सोसायटी असून 10 गावचे कार्यक्षेत्र आहे. सोसायटीचे एकूण 1500 सभासद असून 55 लाख भागभांडवल आहे. 14 लाख रूपये संस्थेची गुंतवणूक असून एका बॅंकेकडे 18 लाख रुपयांचे शेअर्स आहेत. आजअखेर 3 कोटी रुपये पीक आणि मध्यम मुदत कर्ज वाटप केले असून आर्थिक वर्षात संस्थेला 25 लाख रुपये ढोबळ तर, 8 लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. यावर सभासदांना 10 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
यावेळी संचालक दत्तात्रय मानकर, रघुनाथ शिंदे, इंदूबाई शिंदे, संजय उभे, लक्ष्मण मारणे, मधुरा भेलके, सचिव आनंद कुढले, नामदेव सोनवणे, सावित्रीबाई साळुंखे, श्‍याम गायकवाड, भैरवनाथ शेडगे, भाऊ शेडगे, विठ्ठल गुजर व शेतकरी सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन भाऊ मरगळे यांनी तर, आभार अशोक चवले यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)