म्हसवड रस्ता वाहतुकीसाठी त्रासदायक

गोंदवले ः म्हसवडकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरु असून भाविकांना खूप कसरत करावी लागत आहे.

गोंदवले, दि. 8- म्हसवडला येणाऱ्या यात्रेकरूंना आज खचखळग्याच्या रस्त्याबरोबरच गुलाला ऐवजी धुरळा अंगावर झेलतच म्हसवडला पोचावे लागले. म्हसवडच्या सिद्धनाथाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर संबंधितांनी काळजी न घेतल्याने त्रस्त यात्रेकरूनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
म्हसवड येथील सिध्दनाथ यात्रेचा आज (शनिवारी) मुख्य दिवस असल्याने सातारा-पंढरपूर रस्त्यावर भाविकांची मोठी वर्दळ होती. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने मात्र प्रवाशांचे मोठे हाल झाले. साताऱ्याकडून येताना काही भागात रस्त्याच्या एक बाजूचे काम पूर्ण झाले आहे. मात्र बहुतांशी रस्ता पूर्णपणे उखडल्याने प्रवाशांना त्रास सोसतच मार्गक्रमण करावे लागत आहे. म्हसवड यात्रेच्या पार्श्वभूमीवर मात्र संबंधितांनी प्रवाशी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन उपाययोजना राबविणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्याने भाविकांना जीव धोक्‍यात घालूनच प्रवास करावा लागला.आधीच संपूर्ण रस्ता उखरडल्याने प्रवास करणे जिकिरीचे बनले असतानाच रस्स्यावर पाणी न मारल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात धुरळ्याचाही त्रास सहन करावा लागला. अनेकांनी तर म्हसवडमध्ये पोचताच चक्क पाणी विकत घेऊन अंग स्वच्छ केले. यात्रेहून परतणाऱ्या भाविकांना गुलालाच्या रंगाबरोबरच धुराळाच घेऊनच परतावे लागले. भाविक गुलालाने लाल दिसण्या ऐवजी चक्क पांढरे फटफटीत पडत होते तर अनेकांना धुळीची ऍलर्जी असल्याने खूप त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान पळशी फाट्यानजीक या रस्त्यावरून जाताना एक मारुती गाडी घसरून मुरूमच्या भराव्यावरून खाली घसरली, सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)