म्हसवड येथे रास्ता रोको

पिडीत महिलेला न्याय द्याण्याची मागणी
म्हसवड, दि. 3 (प्रतिनिधी) – देवापुर येथे दलित महिलेवर झालेला अन्याय हा म्हसवड पोलिसाच्या कृपेमुळे झाला आहे. पोलिसानी त्या आरोपीला वेळीच जेरबंद असता तर त्या महिलेवर अन्याय झाला नसता. गुंड प्रवृत्तीच्या चव्हाणवर गंभीर गुन्हे आहेत. अशा आरोपीना जामीन देवू नये. त्यांच्या पिडीत कुंटूबियांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शशी देठे यांनी केले.त्यांनी मोर्चाला मार्गदर्शन करुन निवेदन तलाठी यू .बी .आखडमल यांना दिले.
देवापुर येथील विवाहीतेवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देवून जामिन मिळू नये यासाठी पोलिसानी प्रयत्न करावा. आज पर्यंत पोलिसांच्या नकर्तेपणामुळे सोकावलेल्या सराईत गुन्हेगारी प्रवृतीच्या आरोपी मोकाट सुटला होता, त्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी ; या मागणीसाठी दलित संघटनेने म्हसवड बस स्थानका समोर सुमारे एक तास रस्ता रोको केला.म्हसवडचा आठवडा बाजार असल्याने एक तास रस्ता रोकोमुळे पंढरपुर , दहिवडीवरुन येणारी व शहरातील सर्व वाहतुक ठप्प झाली होती . या वेळी बाळासाहेब रणपिसे, बाळासाहेब खरात, कुमार सरतापे, आशोक बनसोडे, शैलेश तोरणे यांची भाषणे झाली. यावेळी डॉ. सागर सावंत, युवराज भोसले, कबीर बनसोडे, आशोक भोसले यांच्यासह शेकडो दलित बांधव उपस्थित होते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)