इतिहासात प्रथमच यात्रेपूर्वी पैसे जमा
म्हसवड – वर्षानुवर्ष सिध्दनाथ यात्रेत जागावाटप करताना पालिकेचे काही मोजके पदाधिकारी कर्मचारी व काही भाई व्यवसायासाठी बाहेरुन आलेल्या व्यावसायिकावर दमदाटी, मनमानी करुन स्वमतलबाच्या हेतुने लाखो रुपये खिशात घालत होते. याची तक्रार मनसुर मुल्ला व युवराज लोंखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर पालिका इतिहासात प्रथमच यात्रेतील जागा वाटपाचा लिलाव कैलास चव्हाण यांनी 9 लाख सहा हजार रुपयांनी घेतला.
यात्रा आली की गल्लीतील दादा, सामाजिक कार्यकर्त्यांपासून पालिकेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळेजण जागा देतो असे सांगून व्यवसायिकांना अडवत होते. जागा वाटपात दर वर्षी पालिकेला दिड ते दोन लाखा पर्यंत महसुल मिळत होता. येथील मनसुर मुल्ला यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे यात्रेतील जागा वाटपात मोठा भ्रष्टाचार होत असल्याने जागा लिलाव पद्धतीने देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी यात्रा नियोजनाची बैठक घेऊन पदाधिकारी यांनी विनावाद जागा वाटप करण्या बाबत आदेश दिले होते.
पार्टी प्रमुख शेखरभाऊ गोरे यांच्या पर्यंत सर्व घडामोडी गेल्याने त्यांनी मुख्याधिकारी पंडित पाटील यांना तातडीने फोन करुन माहिती घेतली. यात्रा पटांगणात सकाळी 11 वा. मोफत करमणुकीची जागा फक्त लिलाव करण्यात आली. या लिलावाचे विविध मंडळींनी फॉंर्म भरले होते मात्र डिपॉझीट कैलास चव्हाण, किशोर सोनवणे, अंकुश पिसे, पप्पू खरारे व सुरेश चव्हाण यांनी भरले. या लिलावाची पहिली बोली 8 लाखानी सुरु झाली ती 9 लाख पाच हजारा पर्यात गेली. हा लिलाव कैलास चव्हाण यांनी घेत पालिकेच्या तिजोरीत यावर्षी प्रथमच यात्रे पूर्वी 7 लाखाचा महसुल जमा झाला. यापूर्वी संपूर्ण यात्रेचा पालिकेला पाच लाखा च्या आत महसुल जमा होत होता. यावेळी तक्रारारीमुळे पालिका इतिहासात प्रथमच लिलाव होऊन पैसे जमा झाला आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा