म्हसवड येथे धनगर साहित्य संमेलन

खा.उदयनराजे भोसले, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या हस्ते उद्‌घाटन

सातारा – धनगर साहित्य परिषदेच्यावतीने तिसऱ्या धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन म्हसवड, ता.माण येथे आयोजन करण्यात आले आहे. दि.18 ते 20 या कालावधीत संमेलन होणार असून ग्रंथदिंडींचे खा.उदयनराजे भोसले यांच्या हस्ते तर संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती संमेलनाचे संस्थापक अभिमन्यू टकले यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी श्री.श्री.सदगुरू साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाळासाहेब कर्णवर, हणमंतराव चवरे, अशोक शेडगे, विष्णु खताळ, टी.आर.गारळे आदी.उपस्थित होते. म्हसवड येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात संमेलन होणार असून शुक्रवार दि.18 रोजी खा.उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजपुजन व ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, सदगुरू साखर कारखान्याचे चेअरमन एन.शेषगिरीराव, भाजप प्रवक्ते गणेश हाके, संमेलनाध्यक्ष डॉ.मुरहारी काळे आदी.उपस्थित राहणार आहेत. शनिवार दि.19 रोजी सकाळी 9 वाजता संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ.मुरहरी केळे, विधान परिषदेचे सभापती रामराजे ना.निंबाळकर, ना.राजकुमार बडोले, ना.विजय शिवतारे, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, सांगलीच्या महापौर संगिता खोत आदी.उपस्थित राहणार आहेत.

या दिवशी दुपारी 1.30 ते रात्री 10 पर्यंत धनगर समाजाच्या विविध विषयांवर चर्चासत्रे, परिसंवाद, व्याख्याने व कवी संमेलन होणार आहे. रविवार दि.20 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 4.45 पर्यंत चर्चा व परिसंवाद होणार असून सायंकाळी 5 वाजता खा.सुप्रिया सुळे व माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते समारोप होणार आहे. त्यावेळी खा.राजू शेट्टी, भारिपचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे ना.निंबाळकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)