म्हसवड यात्रेपूर्वी एलईडी पथदिवे बसवणार

उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी यांची माहिती

म्हसवड – म्हसवड रथयात्रे पुर्वी नगरपालिका हद्दीतील शहर व परिसरातील सर्व एलईडी पथदिवे बसवले जाणार आहेत. यामुळे या पथदिव्यांवर दरवर्षी होणारा दहा लाख रूपये खर्च वाचणार असून विजेचीही बचत होणार आहे. हे पथदिवे हे म्हसवडच्या रथयात्रेपुर्वी बसवले जाणार असल्याची माहिती उपनगराध्यक्षा सौ. स्नेहल सुर्यवंशी यांनी दिली.

केंद्र सरकारने राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका हद्दीत वीज बचतीसाठी एलईडी पथदिवे बसवण्याची महत्वकांक्षी योजना राबवली आहे. या पार्श्‍वभुमीवर म्हसवड नगरपरिषदेने या योजनेसाठी पालिकेचे नगराध्यक्ष तुषार विरकर यांच्यासह पालिकेतील सत्ताधारी व विरोधी नगरसेवकासह सर्वांनी प्रयत्न केले आहेत. या योजनेचा पाठपुरावा करून मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री ना. विजय शिवतारे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून म्हसवड शहरात रथयात्रेपूर्वी हे पथदिवे बसवण्याचे आदेश शासनाच्या संबधित विभागाने पथदिवे बसवणाऱ्या कंपनीला दिले आहेत.

म्हसवड पालिका हद्दीतील शहर व परिसरातील वाड्यावस्त्यांवर जुने पथदिवे काढून नवीन एलईडीचे पथदिवे रथयात्रे पुर्वी बसवले जाणार असून पालिकेला दरवर्षी या जुन्या पथदिव्यांवर होणारा दहा लाख रुपये खर्च वाचणार आहे. हे नविन बसवण्यात येणारे पथदिवे हे एलईडी असून पथदिव्यांमुळे विजेचीही बचत होणार असल्याची माहिती सौ. सुर्यवंशी यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)