म्हसवड बसस्थानक कोंडीचे आगार

म्हसवड  – बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर बेशिस्त पार्किंग तसेच अवजड वाहनाद्वारे व्यापाऱ्यांचा माल उतरवण्यात येत असल्याने वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. यात विशेषत: बसस्थानक चौकात बेशिस्त पार्क केलेल्या वाहनांमुळे बसस्थानक चौक हा मृत्यूचा सापळा बनला आहे.

आठवड्यातून अनेकदा मालवाहू ट्रक माल उतरवण्याचे निमित्त करून बाजारपेठेत थांबत असल्याने म्हसवडमध्ये वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. शहराबाहेर अशा वाहनांसाठी तळ उभारून दुकानदारांनी तेथून माल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हसवड शहरात पंढरपूर नाका ते रिंगावण पेठ हा रस्ता मुख्य बाजारपेठेतून जातो. परंतु हा रस्ता अतिशय अरूंद आहे. त्यामुळे छोटा ट्रक टेम्पो आला तरी वाहतुकीची कोंडी ठरलेलीच एखाद्या दुकानाचा माल उतरेपर्यंत ही कोंडी तशीच तासन्‌तास राहते. हा रस्ता मुळातच अरूंद असून मोठे वाहन रस्त्यावर आले की संपुर्ण बाजारपेठत वाहनांची दुतर्फा रांग लागलेली असते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)