म्हसवड बसस्थानकाला कोंडीचे ग्रहण

म्हसवड, दि. 10 (प्रतिनिधी)-
बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर बेशिस्त पार्किंग तसेच अवजड वाहनाद्वारे व्यापाऱ्यांचा माल उतरवण्यात येत असल्याने वाहनांची गर्दी होऊन वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे. यात विशेषत: बसस्थानक चौकात बेशिस्त पार्क केलेल्या वाहनांमुळे बसस्थानक चौक हा मृत्यूचा सापळा बनला आहे.
आठवड्यातून अनेकदा मालवाहू ट्रक माल उतरवण्याचे निमित्त करून बाजारपेठेत थांबत असल्याने म्हसवडमध्ये वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. शहराबाहेर अशा वाहनांसाठी तळ उभारून दुकानदारांनी तेथून माल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हसवड शहरात पंढरपूर नाका ते रिंगावण पेठ हा रस्ता मुख्य बाजारपेठेतून जातो. परंतु हा रस्ता अतिशय अरूंद आहे. त्यामुळे छोटा ट्रक टेम्पो आला तरी वाहतुकीची कोंडी ठरलेलीच एखाद्या दुकानाचा माल उतरेपर्यंत ही कोंडी तशीच तासन्‌तास राहते. त्यामुळे या कोंडीतून वाट काढण्यासाठी जेव्हा दुचाकीस्वार सरसावतात त्यावेळी दुचाकीचा दुसऱ्या वाहनाला धक्का लागण्याच्या कारणावरून पुन्हा वादावादीचे प्रकार घडतात. हा रस्ता मुळातच अरूंद असून मोठे वाहन रस्त्यावर आले की संपुर्ण बाजारपेठत वाहनांची दुतर्फा रांग लागलेली असते. शहरात लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेले श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचे मंदिर आहे. या देवाला राज्यातून तसेत परराज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. या मंदिराकडे जाणारा रस्ताही मुख्य बाजारपेठेतूनच जातो त्यामुळे या वाहनांमुळेही वाहतूक कोंडी होत असते
म्हसवड मधून जाणाऱ्या सातारा-सोलापूर या हमरस्त्यावरची वाहतूक वाढल्यामुळे नेहमीच या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. या हमरस्त्यावर असलेल्या म्हसवड बसस्थानक चौकामध्ये बसस्थानकाच्या दोन्ही बाजुला 10 फुटावर खाजगी तसेच वडापची वाहने उभी असतात. त्याला जोडूनच मुंबईला जाणाऱ्या खाजगी 10 ते 12 लक्‍झरी बसेस रस्त्यावर उभ्या असतात. या बेशिस्त वाहनांमुळे बसस्थानक चौकात वाहतुकीचा बट्ट्याबोळ होत आहे. या बेशिस्त पार्कींगकडे पोलिस हेतुपुरस्पर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकातून केला जातो आहे. या बेशिस्त पार्कींगकडे व वाहतुकीकडे पोलिसांचे अजिबात लक्ष नसते सातारा-सोलापूर रस्त्याकडेला बसस्थानक चौकाच्या दोन्ही बाजुला दुकाने, व्यापारी गाळे, हातगाडे असल्यामुळे या दुकानासमोर या हमरस्त्यावर चारचाकी, दुचाकी वाहने बेशिस्तपणे पार्क केलेली असतात. त्यामुळे या हमरस्त्यावर वाहतुकीची नेहमी कोंडी होत असते. विषेश म्हणजे ही वाहतुक कोंडीची परिस्थिती पोलिसांसमोर निर्माण होऊनही पोलिस यावर उपाय योजना करताना दिसत नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)