म्हसवड : दोन हजाराची लाच घेताना पोलिसाला अटक

म्हसवड शहरातील एका विक्रेत्याला जामिन मिळवुन देण्यासाठी 2 हजाराची लाच स्विकारणार्‍या पोलिस हवालदाराला रंगेहात पकडले आहे.

म्हसवड शहरात काही दिवसापुर्वी गुटखा विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला होता. ती कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली होती. त्या प्रकरणात तक्रारदाराला जामीन मिळवुन देण्यास बबन काळु पवार या म्हसवड पोलिस ठाण्यातील हवालदाराने मदत केली होती.

-Ads-

त्याबदल्यात पवार यांनी तक्रारदाराला चार हजार रुपयाची मागणी केली होती. चर्चेअंती दोन हजार रूपये देण्याचे ठरले. याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती.

त्यानुसार म्हसवड पोलिस ठाण्याच्या आवारातच सापळा लावला. त्यामध्ये बबन काळु पवार हा दोन हजाराची लाच घेताना रंगेहात सापडला. त्याच्यावर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
20 :thumbsup: Thumbs up
8 :heart: Love
2 :joy: Joy
21 :heart_eyes: Awesome
6 :blush: Great
8 :cry: Sad
8 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)