म्हसवडला वाळू माफिया जेरबंद

सपोनि. मालोजी देशमुखांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह

सातारा, दि. 21(प्रतिनिधी)-

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माण गंगेच्या नदीपात्रातील काळे सोने लुटून गब्बर झालेल्या व म्हसवड पोलिसांशी प्रामाणीक दोस्ताना असलेल्या वाळूमाफीयांच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या. ही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांच्या आदेशाने पो.नि.विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या स.पो.नि. विकास जाधव यांच्या पथकाने केली. यावेळी वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांसह चोरलेली वाळू,मोबाईल असा 23 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

नितीन विष्णू कलढोणे, विक्रम लक्ष्मण राऊत (दोघे रा.(रा. राऊतवाडी, म्हसवड) बाळासाहेब बयाजी विरकर,किसन नागु विरकर (दोघे रा. विरकारवाडी)आकाश आर्जुन गिरी (गुरव गल्ली,म्हसवड) रवी टाकणे (रा.शिक्षक कॉलनी म्हसवड) शांताराम नाना शिंगाडे (रा. शिरताव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
म्हसवड व परिसरात चोरट्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांना मिळाली
होती. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांना दिल्या होत्या. त्यानुसार कुंभार यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. मिळालेल्या सुचना व माहितीनुसार जाधव यांनी दि. 20 रोजी मध्यरात्री राऊतवाडी गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या वाळूच्या अवैध उपश्यावर छापा टाकला.

यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एमएच 10 झेड 3107 व एमएच 10 झेड 1449) हे दोन डंपर व नंबरप्लेट नसलेला एक ट्रॅक्टर जप्त केला. या वाहनांसह सुमारे पाच ब्रास वाळू जप्त केली गेली आहे. ही कारवाई एलसीबीचे स.पो.नि. विकास जाधव, सहाय्यक फौजदार मोहन घोरपडे, हवालदार कांतीलाल नवघणे, शरद बेबले, मुबिन मुलाणी, मोहन नाचण, रुपेश कारंडे, प्रवीण फडतरे, नितीन गोगावले, विक्रम पिसाळ, निलेश काटकर, मयूर देशमुख, मारूती आडागळे, विजय सावंत यांनी सहभाग घेतला.

दरम्यान म्हसवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या या वाळू चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केल्याने म्हसवडचे स.पो.नि. मालोजी देशमुख यांच्या कार्यपध्दतीवरच आता माण गंगेच्या पात्रात चर्चा झडू लागल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)