म्हसवडमध्ये शिवजयंती उत्साहात

म्हसवड : छ. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर. ( छाया : नागनाथ डोंबे)

चारा छावणीत हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत छ. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन

म्हसवड, दि. 19 (प्रतिनिधी) – म्हसवड येथे चारा छावणीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हजारो शेतकऱ्यांनी साजरी केली. यावेळी माण तालुका पंचाईत समितीच्या विस्तार अधिकारी संगीता गायकवाड यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, नामदेव चांडवले, शशिकांत राऊत, मारुती लोखंडे, पाडुरंग सरतापे, धनाजी भोसले, बंटी माने, माजी नगराध्यक्ष रवींद्र विरकर, धनाजी माने, महालिंग खांडेकरसह हजार शेतकरी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये उपमुख्याध्यापक अशोक शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. दिलिप माने, महादेव नलवडे, दस्तगीर तांबोळी, शंकर चव्हाण, लक्ष्मण सरतापे, बाळू सरतापे, लक्ष्मण चव्हाण यांच्यासह विद्यार्थीनींनी उपस्थित होत्या.
दरम्यान, वैभव मंडळातर्फे पालखीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची शहरातुन मिरवणूक काढण्यात आली. गणेश मंदिर, म. फुले चौक, बसस्थानक, पंढरपूर रोड, मेन पेठे, छ.शिवाजी महाराज चौकातून, नाथ मंदिर यात्रा पटांगणावर मिरवणूक आली. यावेळी महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. भैय्यासाहेब राजेमाने विद्यालयात प्रा. आर. जी. पवार, मिलिंद शिंगाडे, सुरेश सरतापे, राजू कोले आदी उपस्थित होते. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महाराजांच्या प्रतिमेला कुमार सरतापे यांनी पुष्पहार अर्पण केले. अजिंक्‍य मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा सुशोभित करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)