म्हसवडमध्ये धूम बाईकर्सचा उच्छाद

पोलिस मात्र गांधारीच्या भुमिकेत : कठोर कारवाई होण्याची गरज

नागनाथ डोंबे
म्हसवड, दि. 12 – म्हसवड शहरात सुसाट दुचाकी वाहने चालवणाऱ्या धूम बाईकर्समुळे लहान मुले व अबाल वृध्दांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यांच्या स्टंटबाजीमुळे दुर्घटनेची शक्‍यता आहे. म्हसवड पोलिस ठाण्यात रुजू होताना सिंघम स्टाईलने एन्ट्री करणाऱ्या सपोनि देशमुख यांनी धुम बाईकर्सवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

म्हसवड शहराच्या पोलिस स्टेशनला रूजू होताच सपोनि देशमुख अवैध धंद्यावर चाप आणला होता. परंतु, शहर व परिसरातील गुन्ह्याचे तपास, चोऱ्यांचे तपास अद्यापपर्यंत लागले नाहीत. तसेच बसस्थानक चौकातील अस्ताव्यस्त पार्किंग केलेली वाहनेही अपघाताला निंमत्रण देत असतात. काहीजण दुचाकीच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठा आवाज करत प्रदुषण निर्माण करत आहेत. त्यावर पोलिस काहीच कारवाई करताना दिसत नाहीत. पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा गैरफायदा उठवत सध्या शहराच्या मुख्य पेठेतून काही हुल्लडबाज धुम बाईकर्स सुसाट दुचाकी चालवताहेत. वेडीवाकडी वळणे घेत बेफिकीरपणे बुंगाट जाणाऱ्या दुचाकीस्वारांमुळे लहान मुले तसेच वृद्धांना जीव मुठीत घेवून चालत जावे लागत आहे. यावेळी म्हसवड पोलिस स्टेशनचे ट्रॉपिक हवालदार शहराच्या बाहेर सातारा पंढरपुर राज्यमार्गावर थांबून येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकीस्वारांची लायसन्स तपासत असतात. त्यामुळे पोलिसांना सुसाट दुचाकीस्वारांवरील कारवाईचे वावडे का आहे, असा सवाल मेनपेठेतील नागरिक करत आहेत. मेनपेठेतील एखादी दुर्घटना होण्याची पोलिस वाट पाहताहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. एकंदरीत म्हसवड पोलिस स्टेशनने बेफाम दुचाकीस्वारांची लायसन्स तपासावीत व कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)