म्हसवडमध्ये घरफोडी 15 हजार ऐवज लंपास

म्हसवड, दि. 7 (प्रतिनिधी) – येथील शिक्षक कॉलनीत चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा उचकटून सोन्याचे दागिने व पाच हजारांची रोकड लंपास केली. याबाबत अधिक माहिती अशी, प्रशांत रवींद्र चांडवले यांचे शिक्षक कॉलनीत घर आहे. दि. 6 रोजी ते कुटुंबासह पंढरपूर येथे परगावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराच्या कपाटातील सोन्याचे मिनी गंठण किमंत अंदाजे 10 हजार 800 व पाच हजार रुपयांची रोकड असा पंधरा हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबतची फिर्याद प्रशांत चांडवले यांनी दिली. तपास हवालदार पवार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)