म्हसवडच्या सिद्धनाथ यात्रेसाठी रथ सज्ज

रथगृहातून वाजत-गाजत रथ बाहेर : रथोत्सवासाठी यात्रेकरु, भाविकांची लगबग

म्हसवड – म्हसवडनगरीत – 8 रोजी होत असलेल्या सिद्धनाथ यात्रेच्या पार्श्‍वभुमिवर आज कार्तिकी एकादशीला रथाच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्रींचा रथ रथगृहातून काढण्यात आला. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजपासून म्हसवड यात्रेला सुरवात झाली आहे. यात्रा मैदानात दुकाने उभा करण्याची यात्रेकरूंची लगबग सुरू झाली आहे.

दीपावली पाढव्यादिवशी श्रीसिध्दनाथ व माता जोगेश्‍वरींना हळदी लावून सुरू झालेल्या श्रींच्या लग्नसोहळ्याची सांगता 8 डिसेंबर रोजी होत असलेल्या रथोत्सव यात्रेने होत असते. याच यात्रेच्या पार्श्‍वभुमीवर आज कार्तिकी एकादशी दिवशी रिंगावण मैदानावर असलेल्या रथगृहातून श्रींचा रथ मानकऱ्यांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आला.

यावेळी रथाचे मानकरी अजितराव राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, प्रतापसिंह राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, राजेमाने घराण्यातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत रथ रथगृहातून बाहेर काढण्यात आला. यावेळी रथ ओढण्याचा मान असलेल्या माळी समाजाचे मानकरी पिसे, म्हेत्रे, लिंगे, अबदागिरे, कोले, केवटे, खासबागे, दहिवडे, तर काझी, लोहार, सुतार, समाजातील आदीसह मानकरी उपस्थित होते.

यावेळी मानकरी अजितराव राजेमाने म्हणाले, सालाबाद प्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्रीसिध्दनाथ व माता जोगेश्‍वरीचा रथोत्सवाची यात्रा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी सर्व गावकऱ्यांची आहे. रथ ओढण्याचा मान हा माळी समाजाचा असून या समाजानेही दरवर्षी प्रमाणे रथ प्रदक्षिणा पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.

आज कार्तिकी एकादशी दिवशी श्रींचा रथ रथगृहातुन बाहेर काढण्यात आला असल्याने आता खऱ्या अर्थाने म्हसवडची यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेत यात्रेकरूंना पालिकेतर्फे जागांचे वाटप करण्यात येत आहे. यात्रेतील यात्रेकरूंची दुकाने, पाळणे, मेवामिठाईची दुकाने, हॉटेल, खेळण्यांची दुकाने उभा करण्याची लगबग सुरू झाली आहे. येत्या 8 डिसेंबरला रथोत्सव यात्रेस भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींचा आशिर्वाद घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)