म्हणे भारतातील मेडिकल टुरिझममधून अमेरिकेत इन्फेक्‍शन होतेय

अमेरिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा दावा
वॉशिंग्टन – अमेरिकतील अनेक रूग्ण भारतात उपचारासाठी जातात. त्याला ते मेडिकल टुरिझम असे संबोधतात. पण अशा मेडिकल टुरिझमवर गेलेले रूग्ण अमेरिकेत जंतुसंसर्ग म्हणजेच इन्फेक्‍शन पसरवतात असा आरोप अमेरिकेच्या वरीष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. अमेरिकन संसद सदस्यांच्या एक समितीपुढे बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
डॉ ऍन्थोनी फौसी असे त्यांचे नाव असून ते अमेरिकेच्या एका वैद्यकीय इन्स्टिट्युटचे संचालक आहेत.

त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला भारतातून ही समस्या सध्या मोठ्या प्रमाणात उद्‌भवत आहे. भारतात उपचाराला गेलेल्या रूग्णांपासून अमेरिकेत कार्बपेनेम रेजिस्टंट एंटरोबॅक्‍टेरिया प्रकारचा संसर्ग पसरतो. भारतात उपचारासाठी गेलेले रूग्ण जेव्हा येथील रूग्णालयात पुन्हा दाखल होतात तेव्हा त्यांच्यापासून हा धोका अधिक असतो असे त्यांनी म्हटले आहे. तथापी भारतातून होणारा जंतुसंसर्ग नेमका कशा प्रकारचा असतो आणि तो किती प्रमाणात अमेरिकेत येतो याचा तपशील मात्र त्यांनी जाहीर केला नाही. अमेरिकेतील वैद्यकीय सुविधा आणखी वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मेडिकल टुरिझमला निर्बंध घालावेत किंवा कसे या विषयी मात्र त्यांनी कोणतेही भाष्य यावेळी केले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)