….म्हणून ४१ तासांचा प्रवास करून भारतात येऊ शकत नाही – मेहुल चोक्सी 

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीने अस्वस्थ प्रकृतीचे  कारण देत ४१ तासांचा विमानप्रवास करून भारतात येऊ शकत नसल्याचे म्हंटले आहे. प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्डरिंग अक्ट नुसार विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मेहुल चोक्सीने उत्तर दिले आहे. मेहुल चोक्सीने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज न्यायालयात सुनावणीदरम्यान उपस्थिती लावली.

न्यायालयात मेहुल चोक्सी म्हणाला कि, अस्वस्थ प्रकृतीमुळे ४१ तासांचा विमानप्रवास भारतात येऊ शकत नाही. सोबतच चोक्सीने अंमलबजावणी संचालनालयावर (ईडी) मुद्दाम माझ्या प्रकृतीची माहिती दिली नसल्याचे तसेच चुकीच्या तपासाचा आरोप लावला आहे. शिवाय मी सातत्याने बँकेच्या संपर्कात असून मुद्दा सोडविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही चोक्सीने यावेळी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, पीएनबीमध्ये जवळपास १४ हजार कोटींचा घोटाळा करून नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी फरार झाले होते. चोक्सी सध्या अँटिग्वामध्ये असून सरकार त्यांच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)