…म्हणून हनुमान जाट होते – भाजप मंत्री

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक प्रचारादरम्यान हनुमान दलित आणि वंचित असल्याचे म्हंटले होते. यानंतर अनेक नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली. भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी  हनुमान मुसलमान असल्याचा दावा केला. आता पुन्हा योगी सरकारच्या मंत्र्यांनी हनुमान जाट असल्याचा दावा केला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपाचे कॅबिनेट मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

चौधरी लक्ष्मी नारायण म्हंटले कि, माझ्या विचारानुसार हनुमानजी जाट होते. कारण जर कोणावर अन्याय होत असेल तर काहीही समजून न घेता, ओळख नसताना त्यामध्ये जाट उडी घेतात. असेच हनुमानाजीचे आहे. रावणाच्या तावडीतून सीता माताला सोडवण्यासाठी हनुमानजीने कोणताही विचार न करता भगवान रामाला मदत केली. हनुमानजीची स्वभाव जाटच्या स्वभावाशी मिळता-जुळता असल्यामुळे हनुमानजी जाट आहेत, असा तर्क त्यांनी सांगितला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)