…म्हणून सुषमा स्वराज यांनी मागितली माफी

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत एक चूक केली. या चुकीच्या माहितीबद्दल त्यांनी नंतर माफीही मागितली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच आपल्या नेपाळ दौऱ्यात जनकपूरमध्ये लाखो ‘भारतीयां’समोर भाषण केलं, असे सुषमा स्वराज म्हणाल्या. परंतु, प्रत्यक्षात मोदींनी नेपाळी नागरिकांना संबोधित केलं होतं.

टि्वटरवरून आपल्या या चुकीबद्दल सुषमा यांनी माफी मागितली. ‘ही माझ्याकडून झालेली चूक आहे. मी गांभीर्याने याबद्दल क्षमा मागते,’ असं टि्वट त्यांनी केलं आहे. एनडीए सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या चार वर्षांच्या कारभाराचा लेखाजोखा मांडणारं पुस्तक प्रकाशित केलं. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/SushmaSwaraj/status/1001145977087012864

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)