नवी दिल्ली: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आज ४५वा वाढदिवस आहे. त्याने आता ४६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. आजच ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज डेमियन फ्लेमिंग याचाही वाढदिवस आहे. फ्लेमिंगला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या ट्वीटरवर सचिनला फ्लेमिंग क्लिन बोल्ड करत असल्याचा व्हिडिओ टाकला आहे. त्यामुळे सचिनचे चाहते प्रचंड चिडले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या या खोडसाळपणामुळे सचिनचे चाहते भडकले असून त्यांनी ट्विटरवरून संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. ‘कितीही बंदी घाला, ऑस्ट्रेलिया काही सुधारणार नाही,’ असा संताप एका चाहत्याने व्यक्त केला आहे. तर सचिनच्या एका चाहत्यानेही ऑस्ट्रेलियाला जोरदार प्रत्युत्तर देताना १९९८ मध्ये शारजाह येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत फ्लेमिंगच्या फलंदाजीवर सचिन उत्तुंग षटकार लगावताना दिसत आहे.
Some @bowlologist gold from the man himself – happy birthday, Damien Fleming! pic.twitter.com/YcoYA8GNOD
— cricket.com.au (@CricketAus) April 24, 2018
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा