…म्हणून शूटींग अर्धवट सोडून ​शाहिद कपूर मुंबईत परतला

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरच्या आगामी ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाचे शूटींग सध्या उत्तराखंडमध्ये सुरु आहे. शाहिद कपूर या चित्रपटात  मुख्य भूमिकेत असणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ‘बत्ती गुल मीटर चालू’चे शूटींग सुरू असताना मंगळवारी शाहिदची प्रकृती अचानक बिघडली. सर्दी आणि फ्लूमुळे शाहिदला संवाद बोलणेही कठीण झाले. अखेर शूट रद्द करण्यात आले.  बुधवारी सकाळी शूट पुन्हा सुरु झाले पण शाहिदची प्रकृती आणखीच बिघडली. अखेर त्याने मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चित्रपटाचे शूट लांबणीवर टाकण्यात आल्याचे कळतेय.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)