शिमला : शिमल्यातील पाणी भीषण संकट पाहता आता स्थानिक नागरिक पर्यटकांना शिमल्यात न येण्याची विनंती करत आहेत. पर्यटकांनी शिमल्यात न येता दुसऱ्या ठिकाणी जावं, कारण इथे पाण्याचा फारच तुटवडा आहे, अशाप्रकारच्या पोस्ट नागरिक सोशल मीडियावर करत आहेत.

आंघोळीसाठीचं पाणी सोडाच पण पिण्यासाठीही आवश्यक पाणी मिळत नाही. शिमल्यात आम्हाला पाणी नाही. कृपया शिमल्यात न येता दुसऱ्या पर्यटन स्थळाला जावं,” असं एकाने लिहिलं आहे. तर “सरकारने नियमावली जारी करुन शिमल्यामध्ये न येण्यास सांगायला हवं. इथल्या स्थानिकांना पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत इथे येऊन पर्यटकांनी आणखी अडचणी वाढवू नये,” असा सल्ला एकाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)