…म्हणून विठ्ठलाची व्हीआयपी, ऑनलाइन दर्शन सेवा बंद

पंढरपूर : अधिक मास सुरु झाल्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना विविध सोयी सुविधा देण्यासाठी मंदिर समिती सज्ज झाली आहे. दि. १६ मे ते १३ जून या कालावधीत ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सामान्य भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी व्हीआयपी आणि ऑनलाइन दर्शन बंद करण्याचा निर्णय श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीने घेतला आहे.

बुधवारपासून अधिकमास अर्थात पुरषोत्तम मास सुरवात झाली आहे. दि. १६ मे ते १३ जून या महिन्याच्या कालावधीत राज्यासह इतर राज्यातून भाविक दर्शनाला येतात. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. अधिक मासात दर दिवशी एक लाख भाविक पंढरपूरात दर्शनासाठी येतात. सामान्य भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी मंदीर समितीनं १३ जूनपर्यंत व्हीआयपी आणि ऑनलाइन बुकींग दर्शन सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्थानिक नागरिकांसाठी रोज सकाळी अर्धा तास दर्शनासाठी वेळ ठेवण्यात आली आहे. रोजच्या भाविकांची संख्या लक्षात घेता दर्शन रांगेत पिण्याचं पाणी तसेच स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)