…म्हणून मौनी रॉयला चांहत्यांनी दूध प्यायचा दिला सल्ला

आपल्या स्लिम ट्रिम फिगरसाठी नेहमीच चर्चेत असलेली टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय हिच्यावर तिचे चाहते सध्या भलतेच नाराज आहेत. हटके लुकमध्ये फोटोशूट करून ते फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करने मौनी रॉयला चांगलेच आवडते. तिचे फोटो पाहून चाहतेही तिच्यावर खूश असतात. पण, मौनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंवरून सध्या मात्र हे चित्र उलटे दिसत आहे. हे फोटो पाहून चांहत्यांनी तिला चक्क दूध प्यायचा आणि प्रकृतीची काळजी घ्यायचा सल्ला दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मौनी रॉयचा हा स्लिम अंदाज तिच्या चाहत्यांना मुळीच आवडला नाही. फोटोखाली आलेल्या प्रतिक्रियांवरून तरी हेच दिसते. इन्स्टाग्रामवर मौनीने लेहंगा परिधान केलेला एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिची कंबर भलतीच स्लिम वाटते. सोबत मौनीने आपल्या चेहऱ्यावर बोल्ड मेकअपही केला होता.

मौनीने पोस्ट केलेला हा फोटो पाहून लोकांनी तिला प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच, दररोज दूध पिण्याचाही सल्ला दिला. एका यूजरने तर इतके डाएटींग करणेही चांगले नाही मौनी! असेही म्हटले. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, काही खातही जा यार…! अशीही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, मौनी रॉय ही अक्षय कुमारसोबत गोल्ड नावाच्या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)