…. म्हणून मुख्य आरोपी सांझी रामने रचले होते चिमुकलीच्या हत्येचे षडयंत्र

श्रीनगर -कठुआ येथील 8 वर्षांच्या चिमुकलीच्या हत्येचे षडयंत्र अटक केलेला आरोपी  सांझी रामने रचले होते. पोलिसांनी सांगितले, की सांझी रामने चौकशीत त्याचा गुन्हा कबूल केला आहे. सांझी रामने पोलिसांना सांगितले की मुलीसोबत बलात्कार झाल्याचे त्याला तिच्या अपहरणाच्या चौथ्या दिवशी माहित झाले होते. यात आपला मुलगा सहभागी असल्याने त्याने मुलीच्या हत्येचा निर्णय घेतला. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने 7 मे पर्यंत सेशन कोर्टात या प्रकरणाच्या सुनावणीवर स्थगिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे 10 जानेवारी रोजी अपहरण झाले होते. त्याच दिवशी सांझी रामच्या अल्पवयीन मुलाने  मुलीवर बलात्कार केला. तिची हत्या 14 जानेवारी रोजी झाली आणि 17 तारखेला तीचा मृतदेह सापडला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)