…म्हणून भाजपच्या ५० टक्के खासदारांना मिळणार नाही सेकंड चान्स

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकांना वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिल्याने आता सर्वच पक्षाच्या खासदारांकडून पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मात्र, भाजपाच्या 50 टक्के खासदारांना पुढची टर्म मिळण्याची शक्यता धुसर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या खासदारांच्या कामगिरीवर प्रचंड नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे लोकसभेसाठी विद्यमान खासदारांना उमेदवारी देताना पक्षाकडून त्यांची संसदेतील हजेरी आणि मतदारसंघातील काम या घटकांचा विचार केला जाणार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या संपूर्ण प्रक्रियेवर जातीने लक्ष ठेवून आहेत. यापैकी अनेक खासदारांच्या कामगिरीवर मोदी व शहा प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे 2019 मध्ये या खासदारांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.

मध्यंतरी मोदी व शहा यांनी खासदारांच्या बैठकीत ज्याची कामगिरी खराब असेल त्याला तिकीट देणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. तेव्हाच आगामी निवडणुकीसाठी उमेदवार निवडीचे निकष ठरवण्यात आले होते. यामध्ये खासदारांची मतदारसंघातील कामगिरी, केंद्रीय योजनांची अंमलबजावणी आणि सोशल मीडियावरील सक्रियता या गोष्टींचा समावेश आहे. मात्र, अनेक खासदारांनी नेतृत्त्वाचे हे बोलणे फार गंभीरपणे घेतले नव्हते. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर आपली अकाऊंटसच उघडली नव्हती. अनेकजणांनी केवळ औपचारिकता म्हणून अकाऊंट उघडली पण नंतर त्याकडे ढुंकून बघितले नाही. त्याचा फटका आता या खासदारांना बसणार आहे. भाजपा या निष्क्रीय खासदारांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)