…म्हणून पाक तंबाखूच्या पाकिटांवर लिहिणार आरोग्यविषयक सूचना

इस्लामाबाद: फिलीप मॉरिस, ब्रिटीश अमेरिकन टॉबॅको यांसारख्या आंतरराष्ट्रीय तंबाखू कंपन्यांच्या दबावामुळे तंबाखूच्या पाकिटांच्या ८५ टक्के भागावर तंबाखूचे दुष्परिणाम आणि आरोग्यविषयक सूचना लिहिण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारला बदलावा लागला आहे. आता तंबाखूच्या पाकिटांच्या ६० टक्के भागावरच या सूचना लिहिल्या जाणार आहेत.

पाकिस्तानात दरवर्षी १ लाख लोकांना तंबाखू सेवनामुळे कर्करोग होतो. तसेच कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही मोठे आहे. याचे गांभीर्य ओळखून कर्करोगावर नियंत्रण आणण्यासाठी तंबाखूच्या पाकिटांवर ८५ टक्के भागात तंबाखूचे दुष्परिणाम आणि आरोग्यास तंबाखू हानीकारक असल्याची सूचना लिहिण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने २०१७ मध्ये घेतला. त्यानुसार पाकिटांवर ही सूचना लिहिण्यात येणार होत्या. मात्र, या सूचनांमुळे तंबाखूच्या व्यापारात घट होण्याची भीती फिलीप मॉरीस, ब्रिटीश अमेरिकन टॉबॅको या कंपन्यांना वाटत होती. त्यामुळेच या कंपन्यांनी प्रथम पाकिस्तानच्या आरोग्य खात्यावर हा निर्णय बदलण्यासाठी दबाव टाकला. मात्र, आरोग्य खात्याकडून कंपन्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थेट पंतप्रधानांकडे या कंपन्या पोहोचल्या.

दोन्ही कंपन्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद अब्बासी यांना पत्र लिहिलं. सुरुवातीला त्यांनीही कंपन्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष केलं. पण अखेर या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाखाली प्रधानमंत्री अब्बासी यांना नमावं लागलं. तंबाखूच्या पाकिटाच्या ८५ टक्के भागाऐवजी फक्त ६० टक्के भागावरच आरोग्यविषयक सूचना लिहा, असं पत्र त्यांनी आरोग्य खात्याला लिहिलं. पंतप्रधानांच्या पत्रानुसार आरोग्य खात्याने दोन दिवसांत आपला निर्णय बदलला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)