…म्हणून परदेशी मॉडेलला ताजमहलात प्रवेश नाकारला

नवी दिल्ली : भारतात फिरण्यासाठी आलेल्या एका विदेशी मॉडेलला रामनामाचा दुपट्टा अंगावर ओढल्याने ताजमहलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला असल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे.
दरम्यान, तो दुपट्टा काढल्यानंतरच तिला ताजमहालात प्रवेश दिला गेल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी या मॉडेल भारतात आल्या आहेत. अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया अशा 34 देशांमधल्या तब्बल 46 मॉडेल्सनी यावेळी ताजमहलला भेट दिली. त्यांच्या गळ्यात रामनाम लिहिलेले दुपट्टे असल्याने त्यांना ताजमहलात प्रवेश नाकारण्यात आला. दुपट्टे काढल्यानंतरच त्यांना सुरक्षा रक्षकांनी ताजमहालात प्रवेश दिला. या सर्व घटनेची माहिती मिळताच इथल्या स्थानिक हिंदुत्ववादी नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. हिंदु जागरण मंचाच्या सदस्यांनी गुरुवारी आग्रा येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाच्या बाहेर या घटनेविरोधात निदर्शनेही केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)