… म्हणून ‘त्या’ निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने केली आत्महत्या 

कोल्हापूर- निवृत्त पोलीस अधिकारी बबन पांडुरंग बोबडे आणि रेखा बोबडे हे वृद्ध दाम्पत्य गेली वर्षभर कोल्हापूर  मधील  राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स मधील पाचव्या मजल्यावर भाड्याने राहत होते.मात्र त्यांनी  विवारी रात्री त्यांची पत्नी रेखाच्या डोक्यात स्वत:च्या रिव्हॉल्वरने गोळी घालून तिचा खून केला. त्यानंतर स्वतःच्या डोक्यात त्याच रिव्हॉल्वरने गोळी घालून आत्महत्या केल्याने खळबळ माजली होती.

मात्र आता त्यांनी आत्महत्या का केली याच कारण पोलीस तपासात समोर आलं आहे. ते ज्या घरात भाड्याने राहत होते. त्या घराच्या घरमालकिणीने ते घर सोडण्यासाठी गेल्या ७ महिन्यांपासून त्यांच्याकडे तगादा लावला होता. यातून  त्यांच्यामध्ये अनेकवेळा वाद देखील होत असत याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)