… म्हणून जावेद अख्तर युजरवर भडकले

ज्येष्ठ गीतकार, लेखक जावेद अख्तर नेहमीच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतप्रदर्शन करतात. सोशल मीडियावरही ते बऱ्यापैकी सक्रिय आहेत. किंबहुना या माध्यमातून ते विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट करत असतात. पण, सोशल मीडियावरुन ठाम भूमिका मांडणाऱ्या अख्तर यांची विचारसरणी पाहून एका युजरने त्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना धर्मांध म्हटले आहे.‘जावेद अख्तर उत्कृष्ट कवी आहेत. पण, सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्ट पाहून ते धर्माबाबत किती कट्टर विचारसरणीचे आहेत हे आम्हाला समजले आहे’, असे ट्विट करत एका युजरने अख्तर यांच्याविषयी आपले मत मांडले.

हे ट्विट पाहून अख्तर यांनी त्या युजरला धारेवर धरत त्याला खडे बोल सुनावले. त्या युजरच्या अकाऊंटमध्ये झुरळाचा उल्लेख पाहून हीच गोष्ट हेरत अख्तर यांनी लिहिले, ‘तुझ्याहून जास्त बुध्यांक असणाऱ्या कित्येक झुरळांना मी पाहिले आहे. काहीच अस्तित्त्व नसल्यामुळे मी तुझी चिडचीड समजू शकतो. पण, यात माझा काय दोष? कारण, मी तुझा बाप नाही अशा शब्दात जावेद अख्तर यांनी या  युजरचा समाचार घेतला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)