…. म्हणून जावेद अख्तर यांनी ‘त्या’ विदेशी नागरिकाला खडसावलं

आमिर महाभारतावर आधारित कथानक असणारा चित्रपट साकारणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सूकता आहे. मात्र असं असताना दुसरीकडे  फ्रान्सवा गुतेर नावाच्या एका ट्विटर युजरने या चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ज्याचं ट्विट पाहून ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनीसुद्धा या वादात उडी घेतल्याचं पाहायला मिळालं.

त्या ट्विटर युजने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलेलं, ‘आमिर मुस्लिम असतानाही त्याने पवित्र आणि प्राचीन अशा महाभारतावर आधारित चित्रपटात भूमिका का साकारावी? पुरोगामी विचारांच्या नावाखाली मोदींच्या भाजपाचीही विचारसरणी काँग्रेसप्रमाणेच होतेय? मोहम्मद पैगंबरांच्या आयुष्यावर साकारणाऱ्या चित्रपटात मुस्लिम कोणा हिंदू कलाकाराला भूमिका साकारण्याची परवानगी देतील?’, असा सवाल उपस्थित करत फ्रान्स्वा गुतेरने सर्वांचं लक्ष वेधलं.

त्याच्या या ट्विटचं उत्तर देत जावेद अख्तर यांनी लिहिलं, ‘बेशिस्त माणसा… फ्रान्समध्ये या महाकाव्यावर आधारित पीटर ब्रूक्सच्या निर्मितीत साकारलेली कलाकृती तू पाहिली नाहीयेस का? तुमच्या देशात असे विकृत विचार पसरवण्यासाठी कोणती विदेशी एजन्सी पैसे देते हे मला माहित करुन घ्यायचं आहे.’ अख्तर यांचं हे ट्विट पाहता त्यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या शैलीत या ट्विटर युजरला धारेवर धरल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)