…म्हणून जन्मदात्यानेच केला मुलीच्या हत्येचा प्रयत्न

अमरावती : अमरावतीतील तरुणीला दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम करणे चांगलेच महागात पडल्याची घटना समोर येत आहे. धक्‍कादायक म्हणजे हे प्रेम घरच्यांना मान्य नसल्याने जन्मदात्या पित्यानेच या 19 वर्षांच्या तरुणीला आपले प्राण गमावण्याची वेळ आली होती. परंतु, तिचे दैव बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला आहे.
19 वर्षांच्या तरुणीचे बाहेरच्या जातीतील तरुणावर असलेले तिचे प्रेम कुटुंबियांना मान्य नव्हते. त्यामुळे कुटुंबियांनी तिच्या हत्येचा कट रचला. मामा आणि वडिलांनी तिला चिखलदऱ्याच्या डोंगरातून दरीत ढकलून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, काळ आला होता पण वेळ नाही असेच म्हणावे लागले कारण खोल दरीत पडताना ही तरुणी झाडाला अडकल्यामुळे बचावली. दरम्यान, गस्तीवर असलेल्या वनरक्षकाने तिला पाहिले. त्यानंतर पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. खरे तर ही तरुणी सज्ञान आहे. तिला तिच्या आवडीनुसार प्रियकर, किंबहुना आयुष्याचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. पण खोट्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न तिच्या कुटूंबियांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी तरुणीच्या वडील आणि मामास ताब्यात घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)