…म्हणून चीनने दिला अमेरिकेला गंभीर इशारा

बीजिंग : अमेरिकेच्या दोन युद्धनौकांनी चीन दावा करत असलेल्या दक्षिण चीन समुद्रात प्रवेश केला. त्यामुळे चीनचा तीळपापड झाला. चीननं रविवारी अमेरिकेच्या दोन युद्धनौकांना दक्षिण चिनी समुद्रात पाहिलेसल्याचा दावा केला. चीन दावा करत असलेल्या क्षेत्रातून अमेरिकेच्या युद्धनौकांनी प्रवास केल्याने चीनला संताप अनावर झाला. परंतु अमेरिकेला या कृत्याचा उत्तर कोरिया प्रकरणात फटका बसू शकतो.

गेल्या काही दिवसांपासून चीन दावा करत असलेल्या दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकेनं युद्धनौका उतरवून चीनला चोख प्रत्युत्तर दिल्याचीही चर्चा आहे. समुद्री क्षेत्रात चीन करत असलेल्या दादागिरीला जरब बसवण्यासाठीच अमेरिकेनं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या युद्धनौकांमध्ये अण्वस्त्र नाशक आणि अण्वस्त्रवाहू युद्धनौकांचा समावेश आहे. अमेरिकेने स्वतःच्या नौदलाचा महत्त्वाच्या भाग असलेल्या या नौका दक्षिण चिनी समुद्रात उतरवल्याने चीनसह अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या युद्धनौका चीनच्या आयलंडपासून अवघ्या 12 नॉटिकल लांब आहेत. या क्षेत्रावरून चीनचा शेजारील राष्ट्रांशी वादही सुरू आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांच्याशी अमेरिकेची चर्चा रद्द झाल्यानं अमेरिका आणि चीनच्या संबंधात कटुता आली आहे.

अशातच अमेरिकेच्या युद्धनौकांनी चीनच्या समुद्रात प्रवेश करणं हे तणावपूर्ण स्थितीला निमंत्रण देण्यासारखाच प्रकार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही दक्षिण चिनी समुद्रातील याच वादग्रस्त आयलंडनजीक अमेरिकेची युद्धनौका पाहून चीनला संताप अनावर झाला होता. त्यावेळी अमेरिकेनं चीनच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा, असे म्हणत अमेरिकेच्या या कृतीला चीनने विरोध दर्शवला होता. तसेच चीनच्या वाढत्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी एकेकाळचे कट्टर वैरी असलेले अमेरिका आणि व्हिएतनाम हे दोन देश जुने शत्रुत्व विसरून एकत्र आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)