नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत नरेंद्र मोदींची गळाभेट का घेतली होती याचे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, त्यांनी भारतात वाढती बेरोजगारी नोटाबंदी वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

राहुल गांधी म्हणाले ” जेंव्हा मी संसदेत नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली तेव्हा माझ्या पक्षातील काही लोकांना ते आवडले नाही. मि कोणासोबतही लढू शकतो, विरोध करू शकतो, मात्र मि कोणाचा व्देष करू शकत नाही.”

राहुल गांधी यांनी संसदेत घणाघाती भाषण करून सरकारवर जोरदार टीका केली होती. पण भाषणाच्या अखेरीला त्यांनी भाषण संपवून थेट मोदींच्या आसनाकडे जाऊन त्यांना आलिंगन दिले. त्यावेळी सारे सभागृह अवाक झाले होते. अनेकांनी जागेवर उभे राहुन राहुल गांधींच्या या कृत्याकडे कौतुकाने पाहिले पण राहुल गांधी यांची ही कृती सभागृहातील नियमाला अनुसरून नाहीं अशी समज लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी दिली तर एक केंद्रीय मंत्री हरसिमरन कौर यांनी राहुल गांधी यांच्या कृतीला आक्षेप घेताना हे लोकसभेचे सभागृह आहे येथे मुन्नाभाईची झप्पी, पप्पी चालणार नाही अशी टिप्पणी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)