…म्हणून कंगना राहते सोशल मीडियापासून चार हात लांब

सोशल मीडियाची क्रेझ खूपच वाढत आहे. अनेकांचे यावर अकऊंट्‌स आहेत. मात्र याला अभिनेत्री कंगना राणावत अफवाद आहे. ती नेहमी यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. याचे कारणही काही खास असून ते कंगनाने स्वतःच सांगितले आहे.

कंगना म्हणते, ”सोशल मीडिया वापरण्यात खूपच वेळ जातो. अनेकजण मला अकाऊंट काढण्याचा सल्ला देतात. एवढेच नव्हे तर तू कुठलीही पोस्ट करू नको, तुझ्यावतीने आम्ही तुझे सोशल अकाऊंट हाताळू, असेही म्हणतात. मात्र मला हे खूपच चुकीचे वाटते. माझा स्वत:चा सहभाग नसताना माझ्या नावाने इतरांना माझ्या अकाऊंटवर पोस्ट करण्याची परवानगी मी का म्हणून देऊ? ही माझ्या चाहत्यांची फसवणूक ठरेल आणि ती मला करायची नाही”, असे ती म्हणाली. कंगना लवकरच ”मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी” या चित्रपटात झळकणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)