पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढीमुळे सध्या संपूर्ण देशात सरकारविषयी संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, टीव्ही क्वीन एकता कपूरने आता वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर आपले मत मांडले आहे. ज्यामुळे ती सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एकताने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीचा संबंध लॉँग ड्राइव्ह आणि कपल्सशी जोडला आहे. ज्यामुळे तिची ट्विटरवर खिल्ली उडविली जात आहे. 

यूजर्स तिच्या या वक्तव्याला वायफळ म्हणून संबोधत आहेत. एका यूजरने तर हेदेखील लिहिले की, एकता स्टेजवर पेट्रोल पिऊन गेली होती काय? तर काही यूजर्सनी एकताच्या या वक्तव्याचा संंबंध थेट तिच्या टीव्ही शोबरोबर जोडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)