…म्हणून उमेश मोरे यांनी नाकारली रेल्वेची मदत

आर्थिक मदत घेतल्याचे शपथपत्र मागिल्याचा आरोप 

पुणे – होर्डिंग दुर्घटनेतील जखमींपैकी उमेश मोरे यांच्या कुटुंबियांनी रेल्वेतर्फे देण्यात आलेली मदत नाकारली आहे. “ही रक्कम स्वीकारल्यानंतर रेल्वे प्रशासनावर भविष्यात या घटनेची कोणतीच जबाबदारी राहणार नाही,’ यावर स्वाक्षरी घेतली जात असल्याने ही मदत नाकारल्याचे मोरे यांच्या पत्नी सुवर्णा मोरे यांनी सांगितले आहे.

दुर्घटनेत जखमी आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. मोरे यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश प्रशासनाकडून देण्यात आला. पण, तो त्यांनी नाकारला. याबाबत मोरे यांच्या पत्नी सुवर्णा म्हणाल्या, “उमेश मोरे यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. पुढील काही महिने त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले आहे. घरात कमविणारे ते एकटेच आहेत. मी आणि तीन मुली या सगळ्यांची भिस्त त्यांच्यावरच आहे. तेच आता रुग्णालयात आहेत. आता आम्ही करायचे काय? आमच्याकडे शेती नाही, की जी विकून रुग्णालयाचा पुढचा खर्च करू शकू. अशा परिस्थितीत आमच्या मदतीला धावून येतील. त्यामुळे ते परत कामावर जाईपर्यंत आम्ही करायचे काय? असा प्रश्‍न आमच्यासमोर उभा राहिला आहे.’

याबाबत मोरे यांचे मेव्हणे बालाजी भोसले म्हणाले, “रेल्वे प्रशासन मदत देत आहे, मग ते भविष्यात कोणतीही जबाबदारी राहणार नाही, अथवा आम्हाला कोनताही दावा करता येणार नाही’, यावर का स्वाक्षरी घेत आहेत? उमेश यांना पुढील काही महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे, दरम्यान, या शस्त्रक्रियेमुळे काही बरे-वाईट घडले तर त्यांच्या कुटुंबियांची जबादारी कोण घेणार? याउलट “रेल्वे प्रशासनाकडून आम्हाला आर्थिक मदत मिळाली,’ या आशयाचे पत्र आम्ही त्यांना देऊ. मात्र रेल्वे प्रशासन मदतीच्या नावावर आपली जबादारी झटकू पाहत आहे. जे पूर्णपणे चूकीचे आहे.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)